कमी पाण्यात कशी करावी डाळिंबाची शेती?

कमी पाण्यात कशी करावी डाळिंबाची शेती?

सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळत आहेत. 

शेतकरी कमी पाण्यावर येणारी डाळिंबाची शेती कमी पर्जन्यमान असणाऱ्या भागात करत आहेत.

डाळिंबाची शेती फायदेशीर असली तरी खर्चीक असल्यामुळे योग्य नियोजन करण्याची गरज असते. 

बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी डाळिंबाच्या शेतीबाबत माहिती दिली आहे. 

डाळिंब लागवड करताना 15 ×7.5 किंवा 15×8 या पद्धतीनेच लागवड करणे आवश्यक आहे. 

लागवड करताना ती बेडवर असली पाहिजे जेणेकरून वापसा कंडिशन सतत मिळेल.

भगवा जातीची लागवड केल्यास डाळिंबाचे दर आणि वजन देखील चांगले मिळते.

हलक्‍या प्रतीची, खडकाळ, मुरमाड, डोंगर उताराच्‍या जमिनीत सुध्‍दा डाळिंब चांगले येते. 

डाळिंब कमी पाण्यात येत असले तरी योग्य वेळी डाळिंबाला पाणी देण्याची गरज असते. 

तेल्या रोगापासून बचावासाठी धनुकोप हे ताम्रयुक्त बुरशीनाशक वापरावे, असे चांडक सांगतात.