ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र?  सूर जुळले?

महाराष्ट्राच्या राजकारणात  17 डिसेंबरच्या दुपारी  उडाली मोठी खळबळ.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट.

दोन्ही नेत्यांमध्ये झाली 6-7 मिनिटं चर्चा.

देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना  उद्धव ठाकरेंसोबत होते  आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब  आणि वरुण सरदेसाई.

मुख्यमंत्री झाल्यामुळे ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेले असतील, असं म्हटलं जातंय खरं, परंतु या घडामोडीमुळे सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यांच्या भुवया मात्र उंचावल्या.

येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात समीकरणं बदलली तर वाटायला नको आश्चर्य, अशा चर्चा सुरू आहेत दबक्या आवाजात.

विशेष म्हणजे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये येताच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि महायुतीच्या नेत्यांवर डागलं होतं टिकास्त्र.

नंतर मात्र ते थेट पोहोचले  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात.

मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगितलं, मला महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा.