सीताफळाच्या शेतीनं केलं लखपती
सीताफळाच्या शेतीनं केलं लखपती
मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत.
बीड तालुक्यातील सुशी गावचे शेतकरी कामरान शेख यांना वडिलार्जित 9 एकर शेती आहे.
जिल्हा परिषद शिक्षक असणाऱ्या कामरान शेख यांनी शेतीत प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम झाल्यानंतर शेख शेतीकडे लक्ष देऊ लागले.
शेख यांनी 2020 मध्ये साडेतीन एकर क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने सीताफळाच्या रोपांची लागवड केली.
एनएमके गोल्ड जातीची 16 बाय 8 प्रमाणे 1100 रोपे त्यांनी आपल्या शेतात लावली.
शेख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खत आणि छाटणीचे योग्य व्यवस्थापन केले.
ऑक्टोबर, डिसेंबर ऐवजी ऐन पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यातच सीताफळ तोडणीला आले.
सध्या पुणे, मुंबईत सीताफळाला जवळपास 150 रुपये प्रति किलो असा दर आहे.
आता शेख यांना साडेतीन एकरामधून त्यांना पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.