2000 पेक्षा जास्त प्रकारच्या टिकल्यांची करा ‘इथं’ खरेदी 

टिकली हा एक सौंदर्यालंकार आहे. हा अलंकार स्त्रिया आपल्या कपाळावर लावतात.

गोल, अंडाकार, चंद्रकोर या आकाराच्या टिकल्या असतात.

कोणताही भारतीय लुक किंवा पोषाख हा कपाळावरील टिकलीशिवाय पूर्ण होत नाही.

त्यामुळे ही टिकली स्टाइल स्टेटमेंट म्हणून काम करते.

महिलांच्या सौंदर्यात भर टाकणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे टिकली असते.

त्यामुळे 2000 पेक्षा जास्त व्हराइटी असलेल्या टिकल्या पुण्यातील एका दुकानात मिळत आहेत.

पुण्यातील तुळशीबाग येथे भाग्यश्री बिंदिस या दुकानात तुम्हाला 2000 पेक्षा जास्त व्हराइटीच्या टिकली खरेदी करता येतील.

यामध्ये चंद्रकोर, साधी, गोल, अंडाकृती, खड्यांचे अश्या 2000 पेक्षा जास्त व्हराइटी टिकल्या मिळतात.

5 ते 150 रुपयांपर्यंत येथे टिकल्याची किंमत आहे.