‘आई! पाणी नको  भीती वाटते’  3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या  जाफर गेट मोंढामधील  काळीज पिळवटणारी घटना.

अरमान शेख नावाचा  3 वर्षांचा मुलगा  घराजवळ खेळत होता.

काही दिवसांनी त्याला  ताप येऊ लागला,  तो पाणी पाहून  थरथर कापू लागला.

घाबरत, रडत अरमान  ‘आई पाणी नको मला वाचव’,  असं म्हणू लागला.

मुलाचे शब्द ऐकून  आई घाबरली,  तिने त्याला मिठी मारली,  अंगावरून हात फिरवला.

8 दिवसानंतर तो  डोकं खाजवू लागला  तेव्हा केसात लपलेले  कुत्र्याच्या दातांचे व्रण दिसले.

अरमानला  मोकाट कुत्रा चावला होता,  रेबीजमुळे त्याचा मृत्यू झाला.

शरीरावर कुठेही  गंभीर जखम नसल्याने  कुटुंबाला ते समजलं नाही.