‘इथं’ करा स्वस्तात भांड्यांची खरेदी!

अन्न शिजवण्यासाठी आणि पदार्थ साठवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळी भांडी वापर केली जातात.

मग अशावेळी स्वस्तात भांडी कुठे मिळतील याचा शोध सुरु होतो.

त्यामुळे आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील एका मार्केटबद्दल माहिती सांगणार आहोत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील भांडी बाजार पानदरिबा या भागामध्ये भांड्यांचे होलसेल मार्केट आहे.

या मार्केटमध्ये सध्या विविध प्रकारचे भांडे हे उपलब्ध आहेत.

या मार्केटमध्ये तुम्ही होलसेल दरामध्ये किंवा किलोमध्ये सुद्धा भांड्यांची खरेदी करू शकतात.

या मार्केटमध्ये चमचा, वाटी, ग्लास, ताट, कढई, पातीले, तांबे, लोटा, ट्रे अशा प्रकारचे वेगवेगळे भांडे उपलब्ध आहेत.

यासोबतच स्टीलचे, जर्मन, तांब, पितळाचे, ॲल्युमिनियम या सर्व धातूंचे भांडे सुद्धा उपलब्ध आहेत. किलोमध्ये विशिष्ट भांडे हे भेटतात.

त्यामध्ये हंडा, कळशी, बादली, ताट, पाण्याची टाकी, तांब्याच्या मटका, परात, डब्बे हे सर्व किलोमध्ये भेटतात.

जर्मनची भांडी हे 350 ते 650 रुपये किलो आहेत. स्टीलची भांडी 250 ते 600 प्रति किलो आहेत.

पितळाची भांडी 750 ते 1500 प्रति किलो आहेत. तांब्याची भांडी 950 ते 2000 प्रति किलोने भेटतात.