लग्न जमत नाही? श्रावण महिन्यात शंकराची करा ‘या’ पद्धतीनं पूजा

श्रावण महिन्याला मोठं धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाचं मोठं महत्त्व आहे.

श्रावणात महादेवाची पूजा केल्यानं इच्छित फळ प्राप्ती होते, असं मानलं जातं.

शंकर महादेवाच्या पूजा अर्चनासह खबरदारी घेतल्यास त्याचा व्यक्तिगत जीवनात अनुकुल परिणा दिसून येतो.

 ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी शंकराची कशा पद्धतीनं पूजा करावी याची माहिती नागपूरचे ज्योतिषशास्त्र अभ्यासक भूषण यांनी दिली आहे.

श्रावण महिन्यात दान धर्म, व्रतवैकल्य, चांगले कर्म, केल्यास पुण्य प्राप्त होत असते.

आणि व्यक्तिगत जीवनात सर्वार्थाने उन्नती होत असते.

याच काळात शिवाने अमृतमंथन केलं होते आणि स्वतः विष प्राशन करून सृष्टीवरील संकट आपल्यावर ओढावून सर्वांचे रक्षण केले होते.

याच काळात पृथ्वीचा संपूर्ण भार हा महादेव तोलून धरतात असतो अशी अख्ययिका आहे.

श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल, बेलपत्र आणि पाणी चढवल्यास त्याचा अतिशय फायदा होत असतो.

लग्न जमत नसल्यास, अशा व्यक्तींनी पाण्यासोबत पांढरे फुल चढवून शिवाची मनोभावे पूजा अर्चना केल्यास त्याचे नक्कीच फळ प्राप्त होऊ शकते.

या दिवसात बेलपत्रावर पाणी वाहून ओम नमः शिवाय हा अकरा वेळा शिवनामाचा जप केल्यास रोगराई व आजारातून मुक्तता प्राप्त होत असते.

धनप्राप्तीसाठी शमी पत्राची अर्पण करून नंतर ती तिजोरी ठेवल्यास धनप्राप्तीसाठी मोठी उपयुक्त ठरू शकते,अशी माहिती भूषण यांनी दिली.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)