हनुमान चालीसा का वाचावे?

संकटनिवारक देव म्हणून मारुतीला विशेष महत्त्व आहे. मारुतीला कलियुगातली जागृत देवता म्हंटलं जातं.

मारुतीची कृपा काय राहावी म्हणून अनेक जण हनुमान चालिसाचं पठण करतात.

रोज हनुमान चालीसा पठण करण्याचे काय फायदे आहेत? याची माहिती पुण्यातले ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिलीय.

दररोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते.

आयुष्यात बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते.

हनुमान चालीसाचे पठण केल्यानं त्याची भीती दूर होते.

त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असं जोशी यांनी सांगितलं.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)