श्रावणात उपवासाला करा भगरीचे आप्पे
श्रावणात उपवासाला करा भगरीचे आप्पे
श्रावण हा व्रत वैकल्यांचा महिना असून या काळात अनेकजण उपवास करतात.
उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आल्याने अनेकजण वेगळं ट्राय करण्याचा विचार करतात.
घरातील साहित्याचा वापर करून आपण 15 मिनिटांत भगरीचे आप्पे बनवू शकता.
वर्धा येथील गृहिणी गंगाताई लाकडे यांनी उपवासाच्या आप्प्यांची रेसिपी सांगितलीय.
यासाठी भगर, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरे, कढीपत्ता, तेल, डाळिंब हे साहित्य लागणार आहे.
सर्वप्रथम भगर स्वच्छ धुऊन त्यात शेंगदाणे घालून अर्धा तास भिजू द्यायचे.
हे मिश्रण मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, जिरे आणि थोडसं पाणी ऍड करून बारीक करून घ्यायचं.
चवीनुसार मीठ आणि डाळिंबाचे दाणे, सफरचंदाचे तुकडे वापरून मिश्रण एकजीव करायचं.
या मिश्रणाचे आप्पे पात्रात आप्पे तयार करून घ्यायचे आणि सोबत दह्याची चटणी तयार करायची.
यंदाच्या सणासुदीच्या उपवासांमध्ये तुम्ही देखील ही आप्पे रेसिपी नक्की ट्राय करा.