आंतरराष्ट्रीय खेळाडू का विकतोय चहा?

जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही प्रकारचं दिव्यंगत्व स्वप्नांच्या आड येऊ शकतं नाही. 

याचं मूर्तिमंत उदाहरण नागपुरातील संदीग गवई या दिव्यांग खेळाडूंनं घालून दिलंय. 

संदीप यांनी तिरंदाजीत चमकदार कामगिरी करत जागतिक पातळीवर नाव कमावलंय. 

राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

संदीप यांना लहानपणीच पोलिओ झाल्याने एका पायाने अपंगत्व आले.  

42 टक्के दिव्यांग असले तरी गेल्या 15 वर्षापासून अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय. 

चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 18 हून अधिक पदके त्यांनी पटकावली आहेत. 

आता सरकारच्या उदासीन धोरणामुळे संदीप यांच्यावर चहा पोहे विकून जगण्याची वेळ आलीय.

2018 मध्ये सरकारने नोकरीचे आश्वासन दिले मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने जगण्यासाठी चहा विकावा लागतोय, असे संदीप सांगतात.