सोन्याच्या गुंतवणूकीत पैसे लावायला का घाबरतात गुंतवणूकदार?

म्युच्युअल फंड उद्योग संस्था AMFI च्या आकडेवारीनुसार सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक जानेवारीमध्ये झाली होती.

या मोठ्या गुंतवणूकीनंतर मोठी घट फेब्रुवारीमध्ये झालेली दिसली.

सोन्याच्या गुंतवणूकीमध्ये जानेवारीत 24,000कोटी रुपये गुंतवणूक आली होती

मात्र फेब्रुवारीमध्ये ही गुंतवणूक इतकी घटली की 5,255 कोटी एवढीच गुंतवणूक झाली 

त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भिती निर्माण झाली.

तज्ञांचे मत आहे, जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा गुंतवणूकदार त्यांच्या नफ्यातील काही भाग काढून घेतात जेणेकरून नफा टिकून राहील.

बाजारातील अस्थिरता आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला सामान्यतः सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. 

त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्यातील रस अजूनही कायम आहे.