‘विदर्भातील काश्मीर’ पाहिलंत का?

‘विदर्भातील काश्मीर’ पाहिलंत का?

मान्सून सुरू झाला की अनेकजण पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडतात. 

कोकणातील पर्यटनस्थळांना अनेकांची पसंती असली तरी विदर्भातील ठिकाणंही पर्यटकांना आकर्षिक करतात.

सातपुड्याच्या कुशीत वसलेलं चिखलदरा हे विदर्भातले एक थंड हवेचं ठिकाण आहे. 

समुद्रसपाटीपासून 3 हजार 664 फूट उंचीवर असलेल्या चिखलदऱ्याला ‘विदर्भाचं काश्मीर’ म्हणून ओळखलं जातं.

या ठिकाणी वर्षभर भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. 

थंड वाहणारे वारे, ढगांमधून जाणारी वाट आणि उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

कॉफी, स्ट्रॉबेरीचे मळे, पट्टेदार वाघ, अस्वल पाहत हिंडण्याची हौस भागवायची तर हे ठिकाण उत्तम आहे.

चिखलदराचा शोध 1823 मध्ये हैदराबाद रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या कॅप्टन रॉबिन्सन यांनी लावला.

पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात चिखलदऱ्यात वास्तव्य केल्याचं सांगितलं जातं. 

चिखलदऱ्यात इतिहास प्रेमी, दुर्ग प्रेमींसाठी गाविलगड हा पुरातन बहामनी  किल्ला आहे. 

चिखलदऱ्यात अनेक मनमोहक पॉइंट असून हिरवाईने नटलेला नजरा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरतो.