श्री अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा कसा असतो?

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या धार्मिक विधी कोल्हापुरात मोठ्या भक्तीमय वातावरणात होतात. 

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यातील देवीच्या अवभृत स्नानाचा विधी नुकताच संपन्न झाला. 

पण हा अवभृत स्नानाचा विधी म्हणजे नेमकं काय? हा विधी का केला जातो? हे अनेकांना माहिती नसेल.

श्री अंबाबाई मंदिरामध्ये अधिक श्रावण मासानिमित्त धार्मिक अनुष्ठान सुरू होते.

अनुष्ठान समाप्तीनंतर श्री अंबाबाई देवीच्या अवभृत स्नानाचा सोहळा संपन्न होतो.

यासाठी शाही लवाजम्यासह देवीची उत्सवमूर्ती पालखीतून पंचगंगा नदीकडे रवाना होते.

पंचगंगा नदीतीरावर कित्येक वर्षांच्या परंपरेप्रमाणे धार्मिक विधी होऊन अवभृत स्नान सोहळा संपन्न होतो

यानंतर जलक्रीडा करून देवीची उत्सवमूर्ती पारंपारिक मार्गाने पालखीतून मंदिरात आणण्यात येते. 

नंतर पूर्णाहुती होऊन पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अनुष्ठानाची सांगता करण्यात येते.

अनुष्ठान समाप्तीनंतर होणाऱ्या या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.