महायुतीतून पहिला मित्रपक्ष बाहेर
विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर 24 तासांमध्येच महायुतीला पहिला धक्का बसला.
महायुतीमधून पहिला मित्रपक्ष बाहेर पडला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर महायुतीच्या बाहेर पडले आहेत.
आमदारकीची टर्म पुन्हा न मिळाल्यामुळे महादेव जानकर नाराज होते.
महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहेत.
परभणीमधून महादेव जानकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, पण त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
लोकसभा निवडणुकीवेळीही महादेव जानकर महाविकासआघाडीसोबत जायच्या तयारीत होते, यासाठी त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चाही सुरू होती,
पण शेवटच्या क्षणी महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला होता.
20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात सर्व 288 जागांवर मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.