वर्ध्यातील ही 10 ऐतिहासिक ठिकाणे पाहाच

वर्धा शहरासह जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असून जगभरातून लाखो पर्यटक येथे येत असतात.

आपणही वर्धा येथे येण्याचा विचार करत असाल तर ही 10 ठिकाणे नक्की पाहा. 

वर्धा येथील महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देतोय. 

आचार्य विनोबा भावे यांनी धाम नदी काठावर पवनार येथे स्थापन केलेला परमधाम आश्रम आहे. 

धाम नदीत विनोबा भावे अंत्यविधी स्थान आणि महात्मा गांधींच्या अस्थींचे स्मारकही आहे. 

जपानवरील अणू बॉम्बची प्रतिक्रिया म्हणून उभारलेला वर्धा येथील विश्वशांती स्तूप जगाला शांतीचा संदेश देतोय. 

विनोबांच्या गीताईतील 18 अध्याय दगडांवर कोरलेले विना छत आणि भिंतींचे गीताई मंदिर प्रसिद्ध आहे. 

ग्रामोद्योग आणि ग्रामविकासाच्या संकल्पनेवर आधारीत असलेले मगन संग्रहालय ऐतिहासिक आहे. 

महात्मा गांधींनी स्थापन केलेली राष्ट्रभाषा प्रचार समिती ही संस्था अद्याप कार्यरत आहे. 

वर्धा-नागपूर मार्गावरील केळझर येथील टेकडीवर श्री सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे. 

लक्ष्मीनारायण मंदिर या मंदिराची ऐतिहासिक ओळख असून 100 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. 

वर्धा नागपूर मार्गावरील खडकीच्या हनुमान मंदिराला दीडशे वर्षांची परंपरा आहे.