फक्त 100 रुपयात ‘इथं’ करा शर्टची खरेदी

महिलांप्रमाणेच पुरुषांच्या कपड्यांचेही आता वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

वेगवेगळ्या ब्रँडकडून त्याचं आक्रमक मार्केटिंग केलं जातंय. त्याची किंमतही चांगलीच असते.

या महागड्या शॉपिंगमुळे खिशावर ताण येतो.

हा कमी करायचा असेल तर मुंबईतल्या एका स्वस्त दुकानाची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

त्यामध्ये तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये शर्टची खरेदी करता येईल.

मुंबईतल्या मुलुंड मार्केटमधल्या वाइल्ड शॉप या ठिकाणी पुरुषांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेण्डी कपडे मिळतात.

हे पुरुषांच्या कपड्याचं होलसेलमध्ये विक्री करणारं दुकान आहे.

इथं सध्या ट्रेन्डमध्ये असलेले फॅन्सी शर्ट, चायनीज कॉलर शर्ट, चेक्स शर्ट असे अनेक प्रकारचे शर्ट फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.