भट्टीवर भाजलेले 6 वडापाव एकाच ठिकाणी; कुठं मिळतील?
मराठी तरुणाईचं आवडतं फास्ट फुड म्हणजे वडापाव.
मुंबई आणि पुण्यातले वडापाव हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
पुण्यातल्या प्रत्येक भागातले वडापावचे गाडे असून तिथं नेहमी गर्दी असते.
पुण्यात एकाच ठिकाणी सहा वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव मिळतात. कोणते आहेत हे वडापाव पाहूया
पुण्यातल्या पौड रोड भागात प्रतिक निळगुळकर यांनी 2018 साली एका छोट्याश्या गाड्यावर हा वडापाव सुरू केला.
एकाच प्रकारचा वडापाव देण्यापेक्षा वडापावचे वेगवेगळे प्रकार निगुळकर यांनी सुरू केले.
त्यांच्याकडं साध्या वडापावसह चीज बर्स्ट, तंदूर, झटका, पेरी पेरी, मेयोनीज आणि शेजवान असे प्रकार मिळतात.
या वडापावची किंमत 25 रुपयांपासून सुरू होते.
हे वडापाव कोळशाच्या एका भट्टी वर भाजले जातात.