इथं फक्त 10 रुपयांपासून मिळतात मातीची भांडी

हल्ली घर सजवण्यासाठी एखाद्या सिनेमामध्ये पाहिलेलं इंटेरिअर घरात वापरण्याचा प्रयत्न केला जातो.

अलिकडे सजावटीसाठी आणि जेवणासाठी घरात मातीची भांडी वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

पुण्यात ही मातीची भांडी अगदी 10 रुपयांपासून मिळतात असं म्हटलं तर आपला विश्वास बसणार नाही.

पण शिवाजीनगरच्या बाजूने येताना डेंगळे पूल संपला की कुंभारवेस सुरू होते. 

सध्या वेस या ठिकाणी उरली नसली तरी या परिसराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे. 

कुंभारवाड्यात विविध प्रकारची मातीची भांडी आणि शोभेच्या वस्तू विक्रीसाठी आहेत. 

या ठिकाणी असणाऱ्या दुकानांमध्ये 10 रुपयांपासून मातीच्या वस्तू मिळतात. 

इथे चक्क 10 रुपयाला चहाचा कप आणि 200 रुपयाला मोठी कढई मिळते.

मातीच्या भांड्यामध्ये माठ, पाण्याची बाटली, कढई, तवा, दिवे, ग्लास असे खूप प्रकार आहेत. 

या भांड्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास ती 7 ते 8 वर्षे टिकतात, असं दुकानदार सांगतात.