अर्ध्या तासात विरघळेल बाप्पांची मूर्ती
अर्ध्या तासात विरघळेल बाप्पांची मूर्ती
सध्याच्या काळात पर्यावरणपूरक गणपती उत्सव करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे.
गणेशमूर्ती आणताना अनेकजण पीओपी ऐवजी मातीच्या मूर्तीला प्राधान्य देतायंत.
पुण्यातील मूर्तिकाराने आता शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या आहेत.
अभिजीत धोंडफळे हे अशी कामगिरी करणारे पहिलेच भारतीय मूर्तिकार ठरले आहेत.
पीओपीला हे पर्यायी मिश्रण असून त्यांना गणपती मूर्ती बनवण्याचं पेटंटही मिळालंय.
विशेष म्हणजे या मूर्ती केवळ अर्धा तासात पाण्यात विरघळून जातात.
मूर्तिकार अभिजीत यांचे कुटुंबीय परंपरागत 4 पिढ्यांपासून शाडू मातीच्या मूर्ती बनवतात.
अभिजीत यांच्या आजोबांनी 1955 मध्ये पर्यावरण पूरक पेपर पल्प पासून बनवलेली गणेशमूर्ती अजूनही आहे.
अभिजीत यांनी वडिलांच्या नावावरून या मिश्रणाचं नाव ‘रवींद्र मिश्रण’ ठेवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये त्यांच्या पर्यावरणपुरक गणेशमूर्ती चळवळीची नोंद घेतली.
महाराष्ट्राच्या सृष्टीनं जग जिंकलं
Learn more