निसर्गाचा अद्भुत अविष्कार आहे हा धबधबा

निसर्गाचा अद्भुत अविष्कार आहे हा धबधबा

पावसाळा म्हटलं की निसर्ग पर्यटनासाठी आणि भटकंतीसाठी वेगळीच पर्वणी असते. 

महाराष्ट्राला सह्याद्रीचे वरदान लाभले असून अनेकजण पर्यटनासाठी या काळात बाहेर पडतात.

डोंगर दऱ्या, गड किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे आणि धबधब्यांना पर्यटक आवर्जून भेट देतात. 

रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ असणारा कुंभे धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. 

डोंगराच्या कुशीतून वाट काढत 178 फूट उंचीवरून खाली झेपावणारा हा धबधबा निसर्गाचा आविष्कारच आहे. 

कड्यावरून खाली कोसळणाऱ्या कुंभे धबधब्याच्या पांढऱ्या शुभ्र धरा डोळ्यांचे पारणे फेडतात.

कुंभे धबधब्याला वर्षाकाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. 

महाबळेश्वर, चिखलदरा, माथेरान प्रमाणेच कुंभे हे देखील थंड हवेचे ठिकाण आहे. 

या परिसरात अनेक पर्यटन स्थळ असल्याने येथे कायम पर्यटकांचा ओघ असतो. 

मुंबईपासून 144 तर पुण्यापासून 115 किलोमीटर अंतरावर हा कुंभे धबधबा आहे.