चक्क दगड आणि बियांची राखी
चक्क दगड आणि बियांची राखी
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिण्याच्या नात्याचा अनोखा बंध मानला जातो.
बहीण या दिवशी भाऊरायाच्या हातात राखी बांधते तर भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी खास भेट देतो.
अलिकडे पर्यावरणपुरक राखीचा ट्रेंड असून अनेकजण आपल्या भावासाठी हटके राखी निवडतात.
छत्रपती संभाजीनगरमधील इनोरी क्राफ्ट यांनी पर्यावरणपुरक राखीचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेत.
पालक, काकडी, तुळशीच्या बियांच्या सुंदर राखी इथं उपलब्ध असून त्या आपण मागवूही शकतो.
लोकरीच्या धाग्यापासून हाताने विणलेली राखी आकर्षणाचा विषय ठरतेय.
नैसर्गिक रंग आणि बिया, पाने, फुले यांपासून बनवलेल्या राख्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
रक्षाबंधन झालं की ही राखी कुंडीमध्ये लावून त्यातून छान झाड येऊ शकतं, अशी ही कल्पना आहे.
इनोरी क्राफ्ट यांनी पेबल आर्ट म्हणजे दगडांवरती छान कलाकृती तयार करून राखी बनवली आहे.
विशेष म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण पेबल आर्ट्सची राखी 80 रुपयांत तयार करून घेऊ शकतो.