महाराष्ट्रातील ‘या’ गावात प्रत्येक जण करतो मोसंबीची शेती!
प्रत्येक शेतकरी आपल्या परिसरातील हवामान, जमिनीचा पोत, आर्थिक परिस्थिती आणि शेतीचं शिक्षण याच्या आधारावर शेती करत असतो.
त्यामुळे प्रत्येक शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिकं दिसतात.
पण, बीड जिल्ह्यातल शिरसमार्ग मोसंबीचं गाव आहे. या गावातील प्रत्येक शेतकरी हा मोसंबीची शेती करतो.
2002 साली गावातील अनिल पवळ, संभाजी पवळ, या दोन शेतकऱ्यांनी एकत्र येत सहा एकर शेतीवर मोसंबीची लागवड केली.
त्यावेळी शेतात फवारणीसाठी कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान अवगत नव्हते.
यांनी मेहनत करत मोसंबीच्या रोपाचे बागेत रूपांतर केले त्यांना त्यावेळी वर्षाकाठी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
पवळ यांनी मोसंबी शेतीचा केलेला हा प्रयोग गावात चांगलाच हिट झाला.
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट देत हा प्रयोग समजून घेतला.
आजा शिरसमार्ग आणि परिसरातील चार गावांमध्ये मिळून जवळपास बाराशे हेक्टर परिसरात मोसंबीची लागवड केली जाते.
मोसंबीमधून गावाचं वार्षिक टर्नओव्हर हे 30 ते 35 कोटींपर्यंत पोहचलंय.