श्रावणातील पूजा साहित्यावर 60% सूट, कुठे?

श्रावण हा व्रत वैकल्याचा महिना आहे. या महिन्यात वेगवेगळे सण आहेत.

त्या निमित्तानं घरात पूजा तसंच यज्ञ केली जातात.

या पूजेसाठी लागणारं साहित्य जमवण्यासाठी अनेकदा धावपळ करावी लागते.

डोंबिवलीकरांना ही धावपळ कमी होणार आहे.

कारण, पूजेचं सर्व साहित्य मिळणारं एक ठिकाण डोंबिवलीत असून तिथं या वस्तूंवर तब्बल 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवर पूजाधाम या मंदिरात हे साहित्य मिळते.

या दुकानात ब्राँझमधल्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती मिळतात.

देवाचे कपडे, कापसाच्या वाती, तांब्याची भांडी, कंठी, जपमाळ, समई, दिवे अशा पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू येथे उपलब्ध आहेत.