शाळकरी मित्रांनी सुरू केले तरुणाईचे आवडते शॉप!
उन्हाळ्यात कोल्ड कॉफी आणि थंडीत हॉट कॉफी प्यायची असा कॉफी लवर्सचा एक फंडा आहे.
डोंबिवली शहर त्याला अपवाद होते. डोंबिवलीत गेल्या काही वर्षांपासून चांगले कॉफी शॉप नव्हते.
डोंबिवलीकरांची ही कमतरता मागच्या 4 महिन्यांपासून दूर झालीय.
दोन मित्रांनी एकत्र येऊन शहरात कॉफी शॉप सुरू केलं असून त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
अथर्व कुलकर्णी आणि मंगेश कुसुरकर या दोन शाळेपासून एकत्र असलेल्या मित्रांनी हे कॉफी टॉफी सुरू केलंय.
हॉट आणि कोल्ड कॉफी सोबतच या दुकानांत मिळणाऱ्या मोजिटो, आईस टी आणि मिल्कशेकची चव देखील क्या बात है असं म्हणायला लावणारी आहे.
जावा चीप कॉफी, कॅरेमल बटरस्कॉच फ्रेप, सिटी ब्राऊनी असे विविध फ्लेवर्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.