बागेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे! 

विद्यार्थ्यांनी शाळेत पुस्तकाच्या पलिकडे शिकणं ही आवश्यक आहे. 

यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या आष्टा या छोट्या गावातल्या शाळेमध्ये एक खास उपक्रम राबवण्यात आला आहे.

आष्टामधल्या झेडपी शाळेत परसबागेच्या निर्मितीचा उपक्रम शिक्षकांनी सुरु केलाय. 

त्यांनी परसबागेला शिक्षणाशी जोडलंय.

परसबागेचा आकार किंवा परसबागेत उगवणाऱ्या भाज्यांची नावे, त्यांचे रंग, व्यवहारीक ज्ञानातून विद्यार्थी या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवतात.

या शाळेतील परसबागेमध्ये सध्या बीट, मुळा, गाजर, पालक, मेथी, कोथिंबीर लागवड करण्यात आलीय.

लालमाठ, शेपू, टोमॅटो, वांगी, मिरची, पपई, हळद, वाल, काकडी, भोपळा यांचा  ही समावेश आहे.

परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कल्पनाशक्ती मजबूत करणाऱ्या,या उपक्रमाला भविष्यवेधी उपक्रम असं नाव देण्यात आलं आहे.

मुलांनी विविध रंगाच्या छटांमध्ये वावरल्याने मेंदू विकासाला चालना मिळते.

त्यामुळे ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना परस बागेतून मिळणाऱ्या शिक्षणामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने भविष्यवेधी ठरतोय.