100, 200, 500 चं पेट्रोल भरुन तुमच्यासोबत पण होतोय फ्रॉड? कसं ओळखाचं

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जेव्हा लोक पेट्रोल पंपावर डिझेल किंवा पेट्रोल भरण्यासाठी जातात तेव्हा 100 रुपयांऐवजी 110 किंवा 120 रुपयांचं इंधन भरतात.

कदाचित तुम्हीही असंच करत असाल. अखेर यामागचे कारण काय? याने खरंच फरक पडतो का?

पेट्रोल आणि डिझेल भरताना तुम्ही 100 रुपयांऐवजी 110 किंवा 120 रुपयांचं इंधन भरताना पाहिले असेल. त्याचवेळी 500 रुपयांऐवजी 495 रुपयांना इंधन भरण्याची त्यांची पसंती आहे.अखेर यामागचे कारण काय? ही काही ट्रिक आहे की ग्राहकाची हुशारी, चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

त्याची सत्यता जाणून घेतल्याने तुमचा गोंधळ तर दूर होईलच पण इंधन भरताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे देखील कळेल, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.

खरंतर, पेट्रोल पंपावर ज्या अमाउंटमध्ये पेट्रोल विकले जाते याचे कोड सेट केलेले असतात. हे 100, 200, 500 आणि 1000 सारख्या राउंड फिगर आकड्यांमध्ये असतात.

त्याच्या एंट्रीसाठी वन बटण सिस्टम असते. जी पेट्रोल पंप कर्मचारी दाबतात, ज्यामुळे त्यांची मेहनत वाचते आणि काम लवकर होते. तसंच, ग्राहकांना असे दिसते की नंबरद्वारे काही सेटिंग आहे, ज्यामुळे कमी इंधन दिलं जातंय.

अशा स्थितीत या आकड्यांव्यतिरिक्त पैसे देऊन इंधन विकत घेतले तर कदाचित योग्य तेल मिळेल, असा समज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, सत्य यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

पेट्रोल पंप मशीन लिटरमध्ये तेल वितरीत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, म्हणजेच प्रत्येक गणना लिटरच्या संदर्भात केली जाते. त्याला फ्लो मीटर म्हणतात.

एका सॉफ्टवेअरद्वारे लिटरचे रूपयांमध्ये रूपांतर केले जाते. त्यात पेट्रोल किंवा डिझेलचे दर टाकले जातात आणि ते मोजून इंधन ठरवले जाते.

110 किंवा 120 तेल घेतल्याने तुम्हाला जास्त किंवा योग्य तेल मिळेल याचा कोणताही पुरावा नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला पेट्रोल पंपावर विश्वास ठेवावा लागेल.

तुम्हाला योग्य प्रमाणात इंधन हवे असेल तर ते लिटरनुसार भरा आणि घेतलेल्या इंधनाची रक्कम UPI द्वारे भरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

यानंतरही, तुम्हाला काही शंका असल्यास, तुम्ही वजन व मापे विभागात तक्रार करू शकता किंवा https://pgportal.gov.in/ या पोर्टलला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.

पेट्रोल पंप खाजगी कंपनीचा असेल तर तिथे तक्रार करता येईल, ज्याचा टोल फ्री क्रमांक पेट्रोल पंपावरच लिहिला असेल.

न्यूज18 मराठी या लेखात दिलेली माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. या संदर्भात अचूक मत तयार करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.