गिझर – हिटर चालवल्यानंतरही कमी होईल बिल, जाणून घ्या 8 पद्धती

सर्दी टाळण्यासाठी आपण सर्वजण आपल्या घरात हिटर, गिझर इत्यादी वापरतो, त्यामुळे विजेचा वापर वाढतो.

काही टिप्स अवलंबून तुम्ही हिवाळ्यात तुमचे वीज बिल कमी करू शकता.

LED बल्ब दीर्घकाळापासून वापरात आहेत, हे इतर बल्बपेक्षा कमी वीज वापरतात. 

घरात ठेवलेल्या सर्व इलेकट्रोनिक वस्तूंची कार्यक्षमता तपास कारण चांगल्या कार्यक्षमतेचे इलेकट्रॉनिकस वापरल्यास वीज बिल कमी होईल.

गिझरमध्ये थर्मोस्टॅट बसवून, तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता, कारण पाणी गरम झाल्यावर ते आपोआप गिझर बंद करते.

हिवाळ्यात घर नैसर्गिकरित्या गरम करा. उदारणार्थ खिडकी दरवाज्यांना सील टाका, गालिचे आणि जाड पडदे वापरा.

तुम्ही नवीन गिझर विकत घेत असाल तर ५ स्टार रेटिंग असलेलेच खरेदी करा कारण ते कमी वीज वापरते.

उच्च तापमानात गिझर आणि हिटर चालवल्याने वीज बिल जास्त येते, तर सामान्य तापमानात वापरल्यास वीज बिल निम्यावर येऊ शकते.

हिटरचे एअर फिल्टर हिवाळ्यापूर्वी स्वछ करून घ्या, कारण अस्वछ फिल्टर उत्पादनाची कार्यक्षमता कमी करते आणि विजेचा वापर वाढवते.

खिडक्या आणि दारांवर draft excluder बसवल्याने थंड हवा आत येण्यापासून रोखेल, ज्यामुळे घर नैसर्गिकरित्या उबदार राहील आणि हिटरचा वापर कमी होईल.