हिंदू धर्माशी संबंधित मान्यतांमध्ये घराची उत्तर दिशा आर्थिक बाबतीत खूप खास असल्याचे सांगितले जाते.
असे मानले जाते की घराची उत्तर दिशा धनाची देवी लक्ष्मी आणि धानाचे देवता कुबेर यांच्याशी संबंधित आहे.
वास्तुशात्रात घराच्या उत्तर दिशेला रोप ठेवणे खूप शुभ असते.
वास्तूनुसार हे रोप घरामध्ये लावल्यास तेथे कधीही आर्थिक समस्या येत नाही.
वास्तूनुसार शुभ प्रतीक मानले जाणारे मनी प्लांट घराच्या उत्तर दिशेला ठेवावे.
मनी प्लांट घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
ज्या घरात मनी प्लांट उत्तर दिशेला ठेवला जातो त्या घरात राहणाऱ्या लोकांचे उत्त्पन्न वाढते.
अशा घरांमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे आर्थिक नुकसान होत नाही, कर्जाच्या फेऱ्यातूनही वाचता येते.
लक्षात ठेवा मनी प्लांटची वेल जमिनीला स्पर्श करू नये, असे झाल्यास नफ्याऐवजी तोटा होऊ शकतो.