देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत?

पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक ही एक उत्तम जागा आहे. 

देशातील प्रत्येक बँक त्यांच्याकडे जमा केलेल्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी विस्तृत व्यवस्था करते.

पण तुम्हाला माहिती आहे का, की अशा ३ बँका आहेत ज्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात.

या तीन बँका आहेत – SBI, HDFC आणि ICICI.

या तीनही बँकांना RBI च्या D- SIB श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

D- SIB म्हणजे डोमेस्टिक सिस्टमिकली इपॉर्टन्ट बँक.

या अशा महत्वाच्या बँका आहेत त्यांच्या पडझडीने देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त होऊ शकते.

त्यामुळे सरकार आणि RBI या बँकांना कधीही बुडू देऊ शकत नाहीत.

RBI ने २०१५ मध्ये ही यादी सुरु केली.