कर गोळा करण्यात कोणते राज्य आहे सर्वात पुढे?
देशभरातील लोकं आयकराबाबत जागरूक आहेत.
केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, दोघेही नागरिकांकडून कर वसूल करतात.
देशातील सर्वाधिक कर कोणत्या राज्यात जमा होतो हे तुम्हाला माहिती आहे का?
महाराष्ट्रात सर्वाधिक ३९.९ टक्के कर जमा झाला आहे.
यानंतर कर्नाटकाचा क्रमांक लागतो, जिथे एकूण ११.९ टक्के कर जमा होतो.
करांमध्ये दिल्लीत राहणाऱ्या लोकांचे एकूण योगदान १०.४ टक्के आहे.
कर भरण्यात तामिळनाडूचे नागरिक चौथ्या क्रमांकावर असून त्यांचा वाटा ६.५ टक्के आहे.
कर संकलनात पाचव्या क्रमांकावर असलेल्या गुजरातचा वाटा ४.८ टक्के आहे.
ही राज्ये सोडली तर उर्वरित देशातून २७.५ टक्के कर वसूल केला जातो.