सोन्या-चांदीचे दर का वाढत आहेत? ही आहेत 5 कारणं
सोन्याचे दर 81 हजारवर प्रति तोळा पोहोचले आहेत,
चांदीचे दर 1 लाख 2 हजारच्या वर किलोमागे पोहोचले
सणउत्सव आणि लग्नसराईमुळे मागणी वाढली, दर वाढली तरी खरेदी सुरू
शेअर मार्केट कोसळलं, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी
पश्चिम आशियातील संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव
यूएसमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा देखील सोन्या-चांदीच्या किमतींना चालना देत आहे
स्थानिक बाजारपेठेची स्थिती, लग्नसराई आणि मागणी वाढल्याने किंमती पुन्हा गगनाला
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांबाबत अनिश्चितता हे देखील महत्त्वाचं कारण आहे
अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात, या सर्व कारणांमुळे सोन्या-चांदीचे भाव वाढतात
आगामी काळातही त्यात चढ-उतार होत राहण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किंमतीवर अमेरिकेचा परिणाम होणार आहे