भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमा नागरीकांसाठी पूर्णपणे खुली आहे. त्यामुळे या सीमेलगत राहणाऱ्या लोकांसाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाणं अगदी सहज आणि सामान्य गोष्ट आहे.
व्हिसा लागत नाही
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांतील नागरिकांना प्रवासासाठी व्हिसाची गरज नसते. त्यामुळे रोजगार, व्यापार आणि पर्यटनासाठी या देशांमध्ये ये-जा मोठ्या प्रमाणात होते.
नेपाळमध्ये रुपयाचं मूल्य किती?जसा भारतात “रुपया” वापरला जातो, तसाच नेपाळमध्ये “नेपाळी रुपया” (NPR) वापरला जातो. आता प्रश्न असा आपल्या 1 भारतीय रुपयाची नेपाळमध्ये किंमत किती आहे?
भारतीय रुपये vs नेपाळी रुपये
सध्याच्या दरानुसार ₹ 1 भारतीय रुपया = ₹ 1.60 नेपाळी रुपये
म्हणजेच जर तुम्ही भारतातील ₹100 तिथे घेऊन गेलात, तर तुम्हाला जवळपास ₹160 नेपाळी रुपये मिळतील.
हा दर स्थिर का आहे?
1994 पासून भारत आणि नेपाळने चलन विनिमयासाठी निश्चित दर ठरवला आहे. 1 भारतीय रुपया = 1.60 नेपाळी रुपये
हा स्थिर दर दोन्ही देशांतील व्यापार, प्रवास आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी ठेवण्यात आला आहे.
बँक किंवा मनी एक्सचेंज सेंटरमध्ये हा दर थोडा बदलू शकतो. काही सेवा (जसे Wise, Western Union) अतिरिक्त शुल्क घेतात. मोठ्या रकमा बदलताना नेहमी अधिकृत ठिकाणीच व्यवहार करा.
काही सोपी उदाहरणं
₹500 भारतीय रुपये = ₹800 नेपाळी रुपये
₹1000 भारतीय रुपये = ₹1600 नेपाळी रुपये
नेपाळ हा भारताचा शेजारी देश असला तरी त्याची करंसी भारतीय रुपयापेक्षा थोडी कमी मूल्यवान आहे. पण या दोन्ही देशांमधील संबंध आणि प्रवास इतके सुलभ आहेत की पैशाचा हा फरक जाणवतच नाही.