एटीएममध्ये तुमचा व्यवहार का अयशस्वी होतो, हे आहे कारण

एटीएममध्ये तुमचा व्यवहार का अयशस्वी होत आहे का? आम्ही सांगणार आहोत याची कारणं आणि यावर उपाय.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट (POSA) चे ATM व्यवहार वारंवार फेल होत आहेत. NPCI ने ३ डिसेंबर २०२४ रोजी याचे स्पष्टीकरण दिले.

जाणून घेऊयात कोणत्या कारणांमुळे ATM व्यवहार अयशस्वी होतात आणि त्यावर उपाय काय.

ATM कार्ड वर दिलेल्या तारखेपर्यंतच ATM काम करते, त्या तारखेनंतर ATM काम करणार नाही. नवीन कार्ड मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करा.

तुम्ही तुमचा एटीएम पिन विसरल्यास, व्यवहार अयशस्वी होतो. पिन विसरल्यास तो त्वरित बदला.

पैसे काढण्यापूर्वी खात्यातील शिल्लक रक्कम तपासा, जर शिल्लक रक्कम कमी असेल तर व्यवहार अयशस्वी होईल.

तुम्ही एका दिवसात ATM मधून २५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही. तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास व्यवहार अयशस्वी होईल.

NCPIच्या मते, एटीएम समस्या बहुतेक गैर- तांत्रिक कारणांमुळे होत आहेत. NCPI आणि पोस्ट ऑफिस या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

समस्या कायम राहिल्यास, पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा. तेथून तुम्हाला शिल्लक, पिन किंवा नवीन कार्डशी संबंधित समस्यांचे निराकरण मिळेल.