चाणक्यांच्या या ५ गोष्टी लक्षात ठेवा; होणार नाही पैशांची कमी
यावर्षी भरपूर पैसा मिळावा आणि खर्च कमी व्हावा, असाच संकल्प नववर्षात प्रत्येकाचा असेल.
नववर्षात आर्थिकदृष्ट्या बजेटच्या दृष्टीने चाणक्यांच्या या ५ गोष्टी फायद्याच्या ठरतील.
जो माणूस व्यर्थ खर्च करतो, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, त्याच्याकडे कधीही पैसा टिकत नाही असं चाणक्य म्हणतात.
एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त कंजूस असेल, तर त्याच्याकडेही धन टिकत नाही असं चाणक्य म्हणतात.
जो माणूस दान धर्मासाठी पैसे खर्च करत नाही, त्याचा पैसा असाच खर्च होऊन जातो असं चाणक्य म्हणतात.
जो माणूस मेहनती नाही, ज्या व्यक्तीत आळस भरलाय त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.