यंदाच्या सुट्टीत तुमच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी व्हिसाच्या 5 टिप्स; जाणून घ्या
सुट्टीचा हंगाम जवळ आला आहे. पण चिंतामुक्त सुट्टीतील खरेदीचा अनुभव घेण्यासाठी, तुमच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी व्हिसाच्या 5 टिप्स महत्वाच्या आहेत.
घोटाळेबाज ई-कॉमर्स व वैयक्तिक खरेदीचे प्रमाण वाढल्यामुळे कार्डधारकांची माहिती आणि दक्षता न बाळगणाऱ्या ग्राहकांकडून पैसे चोरण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतील.
खरेदीदारांचे अशा धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी व्हिसा आवश्यक टिप्स सांगत आहे.
ज्या चिंतामुक्त सुट्टीतील खरेदीचा अनुभव घेण्यास मदत करतील.
सायबर गुन्हेगार मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी अनेकदा खोटे ईमेल्स किंवा हॉलिडे-थीम ईकार्डचा वापर करतात. ज्ञात नसलेल्या लिंक्सवर क्लिक करणे टाळा आणि प्रत्यक्ष रिटेलर्सच्या वेबसाइटवर ऑफर्सचे सत्यापन करा.
ऑनलाइन शॉपिंग करताना विश्वसनीय वेबसाइट्सचा वापर करणे महत्त्वाचे आहे. ‘https’सह सुरूवात होणाऱ्या आणि पॅडलॉक आयकॉन दाखवणाऱ्या यूआरएलची खात्री घ्या, ज्यामधून सुरक्षित कनेक्शनचा संकेत मिळतो.
कार्ड पेमेंट्स टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन (२एफए), टोकनायझेशन आणि एसएसएल हँडशेक तंत्रज्ञान अशा वैशिष्ट्यांच्या माध्यमातून फसवणूकीपासून प्रबळ संरक्षण देतात.
सुट्टीच्या हंगामामधील धावपळीदरम्यान खरेदींवर देखरेख ठेवणे अवघड ठरू शकते. कोणत्याही अनधिकृत व्यवहारांना ओळखण्यासाठी पेमेंट नोटिफिकेशन्स सेट अप करा आणि वारंवार कार्ड किंवा पेमेंट अॅप स्टेटमेंट्सचे पुनरावलोकन करा.
वैयक्तिक व आर्थिक तपशील सेव्ह व शेअर करण्याबाबत सावधगिरी बाळगा. तसेच, सार्वजनिक वाय-फायवर शॉपिंग करणे टाळा, कारण अनएन्क्रिप्टेड नेटवर्क्समुळे सायबरगुन्हेगारांना डेटा इंटरसेप्ट करणे सोपे जाते.