विराट कोहलीसाठी या देशातून येते पाणी, काळ्या पाण्याची किंमत आणि खासियत वाचून व्हाल शॉक

किंग विराट कोहली रोज जे पाणी पितो त्या पाण्याची किंमत वाचून तुम्हाला देखील शॉक बसेल.

या पाण्याचे फायदे वाचून तुम्हाला देखील हे पाणी पिण्याचा मोह आवरणार नाही. असे पाणी तुम्ही देखील घरी तयार करू शकता.

विराट कोहली हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. त्याची कमाई कोट्यवधींमध्ये आहे, त्यामुळे त्याचा खर्चही कमी नाही.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विराट जे पाणी पितो त्याची किंमत 4,000 रुपये प्रति लीटर आहे.

आता किंमतीवरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की हे सामान्य पाणी नाही.  त्यात अनेक मिनेरल्स आहेत, त्यामुळे त्याचा रंग काळा आहे.

यालाच काळे पाणी Alkaline Water असे म्हणतात. त्याचे हे पाणी फ्रान्स मधून येते अशी महिती मिळते.