‘या’ दोन संघात होणार WTC ची फायनल; एबी डिविलियर्सची भविष्यवाणी!
टीम इंडिया सध्या WTC च्या पाईंट्स टेबलमध्ये टॉपला आहे.
त्यामुळे रोहित अँड कंपनी फायनल गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येतीये.
अशातच साऊथ अफ्रिकेचा स्टार एबी डिव्हिलियर्सने मोठी भविष्यवाणी केलीये.
WTC च्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ नसतील, असं एबी डिव्हिलियर्स म्हणतो.
डिव्हिलियर्सने त्याच्या चॅनलवर यासंदर्भात भाकित केलं होतं.
साऊथ अफ्रिकेसाठी हा प्रवास कढीण असेल, असंही डिव्हिलियर्स म्हणतो.
दरम्यान, साऊथ अफ्रिका सध्या पाईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे.
साऊथ अफ्रिकेकडे फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता केवळ 38 टक्के आहे.
त्यामुळे डिव्हिलियर्सची भविष्यवाणी खरी ठरणार का? असा प्रश्न विचारला जातोय.