ना रोहित ना विराट, संजू सॅमसन म्हणतो ‘हा’ माझा जिगरी यार!

संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्ध खणखणीत शतक ठोकलं होतं.

संजूच्या या खेळीवर कॅप्टन सूर्याने देखील कौतूक केलं. दोघांची जुगलबंदी तुम्ही मैदानात पाहिली असेल.

मात्र, तुम्हाला माहिती का? संजू आणि सूर्या दोघंही खास मित्र आहे. त्यावर संजूने खुलासा केलाय.

आम्ही लहानपणी बराच काळ एकत्र खेळलो आहोत. आम्ही बीपीसीएलमध्ये खूप एकत्र खेळलो आहोत, असं संजू म्हणतो.

भारताकडून खेळण्यापूर्वी आम्ही बराच वेळ घालवला. त्यामुळे आम्ही खूप चांगले मित्र आहोत.

सूर्याला माझा खेळ कळतो आणि मला त्याचा खेळ कळतो. आम्ही एकमेकांचा संघर्ष माहिती आहे, असं संजूने म्हटलंय.

आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. आम्ही आयडिया देखील शेअर करतो, असंही संजूने म्हटलं आहे.