IND vs NZ : अश्विन अण्णाचा नाद खुळा! महान शेन वॉर्नचा विक्रम मोडला

घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 3 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्न तिसऱ्या स्थानावर होता. 

आर अश्विनने आत्तापर्यंत घरच्या मैदानावर सर्वाधिक 85 वेळा 3 प्लस विकेट घेतले आहेत. 

तर शेन वॉर्नच्या नावावर 84 वेळा 3 प्लस विकेट्सचा रेकॉर्ड होता. तर अनिल कुंबळेने 83 वेळा अशी कामगिरी केलीये. 

मात्र, शेन वॉर्नला मागे टाकत अश्विनने हा क्रमांक पटकावला आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच आहे.

अशातच आता WTC पर्यंत अश्विन जेम्स अँडरसनचा विक्रम मोडण्यची शक्यता आहे. त्याने 92 वेळा अशी कामगिरी केलीये.