कोण होणार बीसीसीआयचे नवे सचिव? ‘या’ चार दिग्गजांची नावं चर्चेत!

बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

जय शाह यांनी पद रिक्त केल्यानंतर ज्यांच्या जागी आता कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जातोय.

बीसीसीआय लवकरच सचिव पदावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अशातच आता सचिव पदासाठी चार दिग्ग्जांची नाव समोर आली आहेत. 

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांचं नाव चर्चेत आहे.

भाजप नेते आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचं नाव देखील समोर येत आहे. 

त्याचबरोबर संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांच्या नावाची चर्चा देखील होताना दिसतेय. 

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल हे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत.

दरम्यान, आता बीसीसीआयच्या मानाच्या सचिव पदावर कोण बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.