सावधान! व्हॉट्सॲपचे हे फिचर आणेल तुम्हाला अडचणीत

व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे, भारतासह जगभरात अनेक लोक हे ॲप वापरतात.

व्हॉट्सॲपमध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्यांचा वापरही खूप केला जातो. पण एक खास फिचर आहे, जे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

व्हॉट्सॲपमध्ये व्ह्यू वन्स फिचर आहे. या फिचर अंतर्गत पाठवलेला फोटो एकदा पाहिल्यानंतर लगेच हटवले जातात.

व्ह्यू वन्स फिचर अंतर्गत पाठवलेला फोटो सेव्ह केला जात नाही किंवा त्याचा स्क्रिनशॉटही घेतला जाऊ शकत नाही, यामुळे अनेक वापरकर्ते ते सुरक्षित मानतात.

आज आम्ही तुम्हाला काही खास माहिती देणार आहोत, त्यानंतर तुम्हाला कळेल की View Once हे फिचर तितके सुरक्षित नाही जितके लोक मानतात.

वास्तविक, तुम्ही पाठवलेला फोटो पुन्हा एकदा view once फिचर अंतर्गत पाहता येतो. या फीचरमध्ये एक त्रुटी आढळून आली आहे, जी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेलाही धोका आहे.

व्हॉट्सॲपच्या व्ह्यू वन्स फिचरचा हा दोष फक्त आयफोनमध्ये आढळतो. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की आयफोन युजर्स व्ह्यू वन्स फोटो पुन्हा पुन्हा पाहू शकतात.

यासाठी आयफोन युजर्स एक खास प्रक्रिया फॉलो करत आहेत. मात्र, हा तांत्रिक दोष आहे की आणखी काही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मेटा व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची गोपनीयता राखण्यासाठी अनेक फीचर्स प्रदान करते. येथे तुम्ही तुमचा प्रोफाइल पिक्चर देखील लपवू शकता.