व्हॉट्सॲपच्या या ३ सेटिंग्स नसतील ऑन, तर तुम्ही करत आहात मोठी चूक
व्हॉट्सॲप हे जगभरात सर्वाधिक वापर जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक फिचर्स मिळतात.
तथापि, असे बरेच वापरकर्ते आहेत ज्यांना व्हॉट्सॲपवर उपलब्ध असलेल्या सर्व वैशिष्ट्यांची माहिती नाही.
व्हॉट्सॲप ऍडव्हान्स प्राइवेसी फिचर ऑफर करते. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्यावर हाय-लेवल सेक्युरिटी ऑन करू शकता.
२०२४ मध्ये तुम्ही या फीचर्स चा वापर नसेल केला तर २०२५ मध्ये त्यांना नक्कीच ऍक्टिव्ह करा. हे तुम्हाला अनोळखी कॉल्स आणि लोकेशन चोरीपासून वाचवेल.
हे फिचर चालू करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप लॉन्च करावे लागेल आणि यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करते लागेल.
यानंतर तुम्हाला सेटिंग्समध्ये जावे लागेल, जिथे तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
तुम्हाला स्क्रोल करून खाली यावे लागेल, जिथे तुम्हाला ऍडव्हान्सचा पर्याय मिळेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ३ पर्याय दिसतील.
तुम्ही हे ३ पर्याय ऑन करू शकता, ब्लॉक अननोन, अकाउंट मॅसेज, प्रोटेक्ट IP ऍड्रेस आणि लिंक प्रीव्यूव्ह ऑन करा.
हे फीचर्स ऑन करताच तुम्हाला तुमच्या नंबरवर अनोळखी नंबरवरून येणारे मॅसेज आपोआप ब्लॉक होतील.
यानंतर IP ऍड्रेस प्रोटेक्शनच्या मदतीने तुमचे लोकेशन कोणालाही कळू शकणार नाही.
जर तुम्ही हे ३ फीचर्स ऑन केले नसेल तर तुम्ही एखाद्या घोटाळ्याचे बळी होऊ शकता.