Suzuki Access 125 चे अपडेटेड व्हर्जन लाँच; किंमत, फीचर्स अन् सर्व काही फक्त एका क्लिक वर

125 cc स्कूटर सेग्मेंटमध्ये सुझुकी अॅक्सेस 125 सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे.

बऱ्याच दिवसांपासून या स्कूटरचे कोणतेही अपडेटेड मॉडेल लाँच झाले नव्हते. परंतु, अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये Access 125 ची 2025 नवीन व्हर्जन लाँच केली आहे.

ही स्कूटर तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. Access 125 ची किंमत ८१,७०० ते ९३,३०० रुपयांच्या दरम्यान आहे.

Access Standard Edition: एलसीडी इन्स्ट्रुमेंट स्क्रीन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, हॅजार्ड लाइट आणि पुढील बाजूस ड्युअल युटिलिटी पॉकेट्स आहेत. नवीन Access Standard Edition ची किंमत ८१,७०० रुपयांपासून सुरू होते.

सुझुकी अॅक्सेस 125 स्पेशल एडिशन: उत्तम ब्रेकिंगसाठी यात समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेकची सुविधा आहे. हे बेस मॉडेलपेक्षा थोडे अपडेटेट मॉडेल आहे. नवीन अॅक्सेस स्पेशल एडिशनची किंमत ८८,२०० रुपये आहे.

राइड कनेक्ट एडिशन: या स्कूटरमध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. त्यासह युजर्सना कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप अलर्ट, ओव्हर स्पीडिंग अलर्ट, वेदर अपडेट्स व टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखी फीचर्स मिळतात.

राइड कनेक्ट एडिशन हा नवीन अॅक्सेस स्कूटरचा टॉप व्हेरिएंट आहे. त्याची किंमत ९३,००० रुपये आहे.

नवीन Suzuki Access 125 ची डिझाइन आता खूपच चांगली दिसते आहे. त्यामुळे ही स्कूटर खूप स्मार्ट आणि स्लिम दिसतेय.

या स्कूटरमध्ये 124cc, सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 8.4bhp पॉवर आणि 10.2Nm टॉर्क जनरेट करते.