सायबर गुन्ह्यांपासून असा करावा बचाव, जाणून घ्या या टिप्स

अलीकडे सायबर गुन्हेगारीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

सायबर गुन्हेगारीच्या काळात सुरक्षेची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आवाजाची नक्कल करून आर्थिक तसेच खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात बनावट माहिती पसरवत फसवणूक केली जाते.

जर तुम्हाला संशयास्पद फोन आला असेल तर फोन कॉलची खात्री करा फक्त आवाजावर विश्वास ठेवून आर्थिक किंवा महत्वाच्या गोष्टींचा निर्णय घेऊ नका.

महत्वाच्या संभाषणासाठी व्हिडिओ कॉल किंवा सुरक्षित मेसेजिंग App वापर करा.

आपले ऑडिओ डेटा सुरक्षित ठेवा, सार्वजनिक ठिकाणी व्हॉइस नोट्स किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग शेअर करताना सावध राहा.

अज्ञात नंबर वरून कॉल आल्यास कोणत्याही प्रकारचे बँक डिटेल्स, OTP शेअर करू नका.

जर असा गैरवापर तुमच्या लक्षात आला तर जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.

आपल्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना आवाज नक्कलीच्या धोक्यांबद्दल माहिती द्या आणि त्यांना फसवणुकीबद्दल जागृत करा.