GK : Video Call ला मराठीत काय म्हणतात?
अनेक गोष्टी इंटरनेटनं सोप्या केल्या आहेत. साध्या कॉलवरुन लोक आता व्हिडीओ कॉल करु लागले आहेत.
व्हिडीओ कॉलवर समोरील व्यक्तीचा चेहरा पाहून, त्या व्यक्तीचे हावभाव, ती व्यक्ती असलेली जागा सगळंच पाहाता येतं.
साध्या कॉलवरून थेट चेहरा पाहून बोलणे म्हणजे व्हिडीओ कॉल.
एकेकाळी व्हिडीओ कॉलसाठी सायबर कॅफेमध्ये जावे लागायचे किंवा जास्तीचे पैसे द्यावे लागायचे.
यामुळे व्यक्ती कुठेही असली तरी व्हिडीओ कॉलवर त्याच्याशी बोलता येतं.
पण तुम्हाला Video Call ला हिंदीत किंवा मराठीत काय म्हणतात माहितीय?
परदेशात याचा शोध लागल्याने व्हिडिओ कॉल हा शब्द प्रचलित झाला.
चिनी भाषेत याला Shipín diànhuà म्हणतात, तर भारतात अनेकजण “व्हिडिओ कॉल”च म्हणतात.
मराठीत व्हिडिओ कॉलचा शब्द “चलचित्र टेलिफोन” आहे, पण असं असलं तरी इंग्रजी शब्द अधिक लोकप्रिय आहे.