उन्हाळा आला की AC म्हणजेच एअर कंडिशनरचं महत्त्व वाढतं, पण नवीन AC घेताना तुम्ही कधी लक्ष दिलंय का की त्यावर स्टार्स दिलेले असतात
पण ही ‘Star Rating’ म्हणजे नेमकी काय असते? किंव ती काय कामाची असते? हे अनेकांना माहित नाही.
काही AC वर 1 स्टार असतो, तर काहींवर 5 स्टार. पण अनेकांना याचा फायदा माहित नसतो. हे फक्त एक डेकोरेशन लेबल नसतं, तर यामागे आहे वीजबचतीचं मोठं विज्ञान
BEE (Bureau of Energy Efficiency) भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत ही संस्था AC च्या ऊर्जा कार्यक्षमतेचं मूल्यांकन करते.
1 स्टार AC – जास्त वीज वापरतो
तर 5 स्टार AC – कमी वीजेत जास्त कूलिंग देतो
जितके स्टार जास्त स्टार, तितकी जास्त वीज बचत आणि कमी बिलमूल्यांकन करते.
कोणता AC खरेदी करावा?
जर तुम्ही जास्त उष्णतेच्या भागात राहात असाल 5 स्टार AC घ्या. किंमत थोडी जास्त पण वीजबिलात मोठी बचत. कमी बजेट असेल तर किमान 3 स्टार AC निवडा.
इन्व्हर्टर AC तापमानानुसार आपोआप वीज वापर नियंत्रित करतो. त्यामुळे वीजबचत आणखी जास्त आणि कामगिरीही उत्तम
फक्त वीजबिलच नाही, स्टार रेटिंग AC चं आयुष्य आणि कार्यक्षमता ठरवतं. कमी स्टारचा AC लवकर ओव्हरलोड होतो आणि वारंवार दुरुस्तीची गरज लागते.
एक स्मार्ट ग्राहक म्हणून AC घेताना ब्रँड, इन्व्हर्टर टेक्नोलॉजी, स्टार रेटिंग या तिन्ही गोष्टींचा विचार नक्की करा.