कॅमेराचं Megapixel म्हणज नक्की काय?

Megapixel जितका जास्त तितका चांगला कॅमेरा आणि फोटो ही चांगले. असा अनेकांचा समज आहे.

पण तुम्हाला माहितीय का की प्रत्येकवेळी याचा असा अर्थ होत नाही. काही फोनमध्ये कमी मेगापिक्सल असले तरी फोटो चांगले येतात.

मग आता मेगापिक्सल म्हणजे काय? तर 1 मेगापिक्सल म्हणजे 10 लाख पिक्सल्स. फोटोमधील डिटेल्स पिक्सल्सच्या संख्येवर अवलंबून असतात.

यामध्ये कॅमेऱ्याची लेंस, सेन्सरचा आकार, आणि सॉफ्टवेअर प्रोसेसिंग जास्त महत्त्वाचे असतात. सोशल मीडिया, डिजिटल अल्बम किंवा दैनंदिन वापरासाठी 12-20MP कॅमेरा पुरेसा आहे.

जास्त मेगापिक्सल कधी उपयोगी? मोठे पोस्टर्स प्रिंट करायचे असतील, फोटो खूप क्रॉप करायचा असेल किंवा प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी.

सेन्सरचा आकार का महत्त्वाचा? मोठा सेन्सर अधिक प्रकाश कॅप्चर करतो, ज्यामुळे फोटो ब्राइट आणि शार्प होतो, विशेषतः लो-लाईटमध्ये.

पिक्सलचा आकारही महत्त्वाचा मोठे पिक्सल जास्त प्रकाश शोषतात, त्यामुळे नॉईज कमी होतो आणि फोटो नैसर्गिक दिसतो. iPhone सारखे फोन कमी मेगापिक्सल असतानाही उत्कृष्ट फोटो देतात कारण त्यांचे इमेज प्रोसेसिंग खूप प्रगत असते.

108MP किंवा 200MP लिहिणं हे कंपन्यांसाठी आकर्षण आहे. पण खरी क्वालिटी ठरते हार्डवेअर + सॉफ्टवेअरच्या कॉम्बिनेशनवर.