कीबोर्डवरील F आणि J बटणांवर का असते अशी खून?

F आणि J बटणांवरील छोटे उभार हे डिझाईन नाही, तर उपयोगासाठी दिलेले मार्कर आहेत.

कीबोर्डवरील टायपिंगची सुरुवात करण्यासाठी ज्या लाईनचा वापर केला जातो, तिला ‘होम रो पोजिशन’ म्हणतात.

या होम रो लाईनमध्ये A, S, D, F आणि J, K, L, ; ही बटणं येतात.

डाव्या हाताची तर्जनी F वर आणि उजव्या हाताची तर्जनी J वर ठेवली जाते, हेच उभार त्याची जागा दाखवतात.

या उभारांमुळे कीबोर्डकडे न पाहता हात योग्य पोजिशनमध्ये बसतात. हातांची स्थिती पटकन शोधता आल्यामुळे टायपिंग स्पीड वाढतो.

कीबोर्डकडे वारंवार पाहण्याची गरज पडत नाही, त्यामुळे चुका कमी होतात.

स्क्रीनवर लक्ष ठेवून टायपिंग करताना फोकस आणि अचूकता वाढते.

दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींनाही हे raised dots स्पर्शाने ओळखता येतात, त्यामुळे टायपिंग सोपं होतं.

हा छोटा डिझाईन फीचर टायपिंग अधिक प्रोफेशनल, जलद आणि आरामदायी बनवतो.