लहान रस्त्यांवर Google Maps का गोंधळतो?

आजच्या डिजिटल युगात Google Maps आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे. नव्या शहरातलं हॉटेल असो, रेस्टॉरंट असो किंवा ट्रिपचं ठिकाण आपण लगेच Maps उघडतो.

आपल्याला रस्ता दाखवायला गुगल मॅप मदत करतो, पण जेव्हा आपण एखाद्या छोट्या गल्लीत किंवा अरुंद रस्त्यावर जातो, तेव्हा Google Maps का गोंधळतो?

मोठे रस्ते अचूक दिशा, परफेक्ट मॅप मोठ्या शहरातील मुख्य रस्ते, हायवे आणि चौक हे सर्व Google Maps बरोबर दाखवतो, कारण त्यांची सॅटेलाइट इमेज आणि डेटा दोन्ही स्पष्ट असतात. पण गल्लीबोळांमध्ये चित्र वेगळं असतं…

Google Maps ला माहिती मिळते सॅटेलाइट इमेजेसमधून Street View कारद्वारे वापरकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीवरून आणि ऐतिहासिक ट्रॅफिक डेटावरून पण हे सर्व डेटा नेहमी प्रत्येक गल्लीसाठी उपलब्ध नसतात.

अरुंद आणि गर्दीच्या गल्ल्यांमध्ये Street View कार जाऊ शकत नाही. उंच इमारतींमुळे सॅटेलाइट इमेज अस्पष्ट येते.

काही रस्ते वारंवार बदलतात नवीन वळणं, जुने मार्ग बंद होतात. हे सगळं Maps साठी अचूक ठेवणं कठीण होतं.

गल्लींमध्ये सिग्नल कमजोर असतो. GPS सिग्नल इमारतींनी ब्लॉक होतो. त्यामुळे मोबाईलचं लोकेशन काही मीटरने चुकतं. यामुळे “आपण इथे आहात” हे दाखवणं अचूक राहत नाही.

काही गल्लींमध्ये रस्ते इतके गुंतागुंतीचे असतात की त्यांची अचूक माहिती फक्त स्थानिकांनाच असते.

Google Maps हे प्रगत तंत्रज्ञान असलं तरी त्यालाही मर्यादा आहेत, विशेषतः गल्लीबोळांमध्ये. अशावेळी स्थानिकांना विचारणं आणि स्वतः निरीक्षण ठेवणं हेच खरं मार्गदर्शन ठरतं.