Unmarried कपलसाठी OYO नाही, मग दुसरा पर्याय काय?

Oyo Rooms ने आपल्या पॉलिसी बदलण्याचा निर्णय नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेतला आहे.

Oyo ने हा निर्णय आपली बाजारातील ओळख सुधारण्यासाठी घेतला आहे. ओयोला आता कुटुंबे, विद्यार्थी, व्यावसाईक, धार्मिक प्रवासी आणि एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि चांगला अनुभव देणारे हॉटेल म्हणून स्वतःला प्रस्थापित करायचं आहे.

मागच्या काही वर्षांपासून ओयोचा सर्वाधिक वापर हा अविवाहित जोडप्यांकडून केला गेला होता.

तासाच्या भाड्यावर रुम उपलब्ध, कमी डॉक्युमेंट्सची मागणी आणि कमी पैशात चांगली रुम या काही महत्वाच्या गोष्टींमुळे बहुतांश कपल Oyo Rooms वापरायचे.

पण आता Oyo ने अविवाहित जोडप्यांना रुम देण्यावर बंदी घातल्यानंतर बाजारात या कपलसाठी काय पर्याय उपलब्ध असेल? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

बाहेर असे अनेक हॉटेल्स आहेत, जे आजही अविवाहित जोडप्यांना रुम देत नाहीत.त्यासाठी त्यांचे स्वत:चे नियम असू शकतात. जे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असतात.

तसे पाहाता अविवाहित जोडप्यांना खोली किंवा रुम मिळणार नाही, असा कोणताही कायदा भारतात नाही. त्यामुळे अविवाहित जोडपे काही ओळखीच्या हॉटेलमध्ये रुम मिळवू शकतात.

ज्यामध्ये काही लोकल हॉटेल्सचा समावेश असेल. जिथे काही जास्तीचे पैसे किंवा ओळख वापरुन कपल प्रवेश करु शकतात.

ओयो प्रमाणे असे अनेक ऍप्स किंवा प्लॅटफॉर्म बाजारात उपलब्ध आहेत, जिथून तुम्ही रुम बुक करु शकतात. यामध्ये Air bnb ही आहे. पण या प्लॅटफॉर्मवरील रुम्सचे भाडे हे थोडे जास्त असते.

शिवाय Goibio, Booking.com, Makemytrip सारखे पर्याय आहेत, ज्यावरुन तुम्ही हॉटेलरुम बुक करु शकता.

bag2bag हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तासाच्या हिशोबाने कोणीही रुम मिळवू शकतं.